Breaking News

रायझिंग स्टार कामोठे संघ विजेता

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील कुंभारवाडा मिरची गल्लीतील बाळ गोपाळ क्रिकेट संघाने आयोजित केलेल्या अंडर आर्म स्पर्धेत रायझिंग स्टार कामोठे या संघाने विजेतेपद पटकाविले. एस. के. सुकापूर संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेत 16 संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन संतोष गुजरे व मिलन (पिंटू) तांबोळी यांच्या हस्तेे, तर पारितोषिक वितरण नगरसेविका दर्शना भोईर व रूचिता लोंढे यांच्या हस्ते झाले. विजेत्या कामोठे संघास 10 हजार रुपये व आकर्षक चषक आणि उपविजेत्या सुकापूर संघला पाच हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परेश शेट्ये, राकेश पवार, हितेश गायकवाड, भावेश भोईर, राजेंद्र परदेशी, हरि बनसोडे, रितेश पवार, राहुल घोंगे, चंदन खैरे, मनीष बोनकर, तसेच बाळ गोपाळ संघाच्या व कुंभारवाडा युवक मंडळाच्या सभासदांनी मेहनत घेतली.रायगड जिल्ह्यात सध्या क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा होत असून, त्यातून स्थानिक खेळाडूंचे कौशल्य दिसून येत आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply