उरण : वार्ताहर
उरण नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आंतरशालेय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि. 21) नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले. पालिकेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेच्या मैदानावर हा तीनदिवसीय महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शिक्षण सभापती रवी भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, धनंजय कडवे, प्रशासन अधिकारी मधुकर सूर्यवंशी, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, मुख्याध्यापक भारती खेडकर (शाळा क्र. 1), रत्ना गवळी (शाळा क्र. 2), स्नेहल पाटील (शाळा क्र. 3), व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उज्ज्वला पांचाळ, कमलाकर कोळी, सौ. कातकरी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.