Breaking News

जेएनपीटी विश्वस्तपदासाठी निवडणूक; 11 फेब्रुवारीला मतदान; तीन कामगार संघटनांमध्ये चुरस

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटीच्या दोन कामगार विश्वस्त पदासाठी मंगळवारी (दि. 11) घेण्यात येणार्‍या निवडणूकीसाठी पाच कामगार संघटना अधिकृतपणे  मैदानात उतरल्या आहेत. प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्यानंतर कामगार विश्वस्त होण्याची स्वप्न बाळगलेल्या पाचही कामगार संघटनांनी जोरदारपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र खरी तिरंगी लढत शिवसेनाप्रणित जेएनपीटी कामगार एकता संघटना, भाजप प्रणित जेएनपीटी वर्कर्स युनियन आणि सीटू प्रणित न्हावा-शेवा बंदर (अंतर्गत) संघटना या तीन संघटनांमध्येच होईल अशीच सध्याची स्थिती आहे.

जेएनपीटी विश्वस्तांची एकूण संख्या 16 आहे. त्यापैकी 10 विश्वस्त विविध शासकीय विभागातील उच्चपदस्थ अधिकार्‍याची केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाकडून नियुक्त केले जातात. तर चार विश्वस्तांच्या थेट नियुक्त्या राजकिय स्तरावरुन केल्या जातात. उर्वरित दोन विश्वतांची निवड मात्र कामगारांच्या गुप्त मतदानाने केली जाते. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड केली जाते. कामगारांचे प्रश्न, समस्या बोर्डातील विश्वस्तांच्या बैठकीत मांडून सोडविण्यासाठी थेट गुप्त मतदानाने दोन कामगार विश्वस्तांची निवड केली जाते.

जेएनपीटी कामगार विश्वस्तांची निवडणुक जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत बंदरातील सर्वच कामगार संघटना होत्या. तर विविध कामगार संघटनेने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीच्या पुर्व तयारी सुरू केली होती. कामगारांना आकर्षित करण्यासाठी विविध कामगार संघटनांकडून शक्ती प्रदर्शन, आंदोलन करण्यात येत होती. आता 11 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच कामगार संघटना अधिकृतपणे प्रचाराला लागल्या आहेत. सध्या सर्वच कामगार संघटनांनी जाहीर प्रचार सभांचा धडाका सुरू आहे.

1251 एकूण मतदारशिवसेनाप्रणित जेएनपीटी कामगार एकता संघटना, भाजप प्रणित जेएनपीटी वर्कर्स युनियन आणि सीटू प्रणित न्हावा-शेवा बंदर (अंतर्गत) संघटना, शांती पटेल प्रणित न्हावा-शेवा पोर्ट जनरल वर्कर्स युनियन, संघटीत, असंघटीत कामगार सभा आदी पाच कामगार संघटना कामगार विश्वस्त पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 11 फेब्रुवारीला घेण्यात येणार्‍या निवडणुकीत 1251 कामगार मतदार आहेत. यापैकी 65 टक्के मते मिळविणार्‍या संघटनेचे दोन कामगार विश्वस्त निवडून येतील. मात्र एकाच संघटनेचे दोन्ही कामगार विश्वस्त निवडून आणण्याची किमया अद्यापही एकाही कामगार संघटनेला साधता आलेली नाही.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply