कामोठे : रामप्रहर वृत्त
श्री समर्थ सार्वजिक आणि शैक्षणिक संस्थेचे श्री सुविद्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. 11) झाले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कामोठे येथील श्री सुविद्या विद्यालयामध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यायातील विद्यार्थ्यानी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी, नगरसेवक विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, साहित्यिक अमोद उसपकर, श्री सुविद्या विद्यालयाचे चेअरमन श्रावण घरत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रविंद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, अॅड. आशा भगत, बाबासाहेब तुपे, रमेश तुपे, स्वामी म्हात्रे, अर्चना तोमर आदी उपस्थित होते.
रिक्षाचालक सुरेश भोपी यांना सच्चाईचा सन्मानकामोठेमधील सुरेश भोपी या रिक्षाचालकास आपल्या रिक्षामध्ये 2 लाख रुपये रक्कम मिळाली होती. त्यांनी प्रामाणिकपणे ही रोख रक्कम पोलीस स्टेशनमध्ये जमा करुन मुळ मालकास परत केली. त्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाची दखल घेऊन सुविद्या विद्यालयामध्ये झालेल्या स्नेहसंमेलनात सच्चाईचा सन्मान या पुरस्काराने अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या हस्ते भोपी यांना गौरविण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper