पनवेल : वार्ताहर
प.पू.सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या 84व्या जन्मोत्सवानिमित्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 16) मंदिराच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याला साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शिबिरामध्ये हळदीपुरकर हॉस्पिटलच्या वतीने मोफत डोळे तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे विविध रोगांवर तपासण्या करण्यात आल्या. या वेळी डॉ. गिरिश गुणे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. राजश्री पाटील आदींसह उपस्थिती वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना श्री साईनारायण बाबांनी स्वहस्ते प्रसादाचे वाटप केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper