कर्जत : बातमीदार
नेरळ गावाच्या वतीने गेली 55 वर्षे तिथीनुसार सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते. या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून दर्शन दीपक मोडक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी (दि. 16) येथील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष संतोष शेळके यांनी मागील वर्षीच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा आलेख मांडला, त्याला सर्वांनी मंजुरी दिल्यानंतर 2020 सालाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून दर्शन मोडक यांची, उपाध्यक्ष म्हणून कल्पेश देशमुख, ऋषिकेश पाटील यांची तर सचिव म्हणून सूरज साळवी यांची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकार्यांत प्रसाद शिंदे, पराग कराळे यांची (सहसचिव), अजिंक्य मनवे (खजिनदार), आणि उदय मोडक (सहखजिनदार)यांचा समावेश आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper