
खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय जनार्दन भगतसाहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धा मंगळवारी (दि. 25) आयोजित केली गेली. संस्थेच्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाङ्मय मंडळाच्या समन्वयक प्रा. अंजली पौलस्त्ये आणि मंडळाच्या सर्व सभासदांनी केले होते. स्पर्धेमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका घरत हिने तृतीय क्रमांक पटकावला. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व संस्थेचे उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी तिचे अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper