सिडकोविरोधात ठिय्या आंदोलनाचा पवित्रा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कळंबोलीमधील रस्ते, गटारे आदी विविध नागरी कामे पूर्ण न केल्यास सिडको कार्यालयामोर ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा कळंबोली भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदनही देण्यात आले आहे.
अंतर्गत रस्ते व गटारे नवीन करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. तरीसुद्धा त्या रस्त्याचे पॅचवर्क कामाचे कार्यादेश काढण्यात आले आहेत. वाहतूक व येणारा पावसाळा लक्षात घेता या ठिकाणी पॅचवर्क न होता त्या जागी नवीन रस्ते तसेच गटारे तयार करण्याची गरज आहे. गेल्या तीन वर्षांपासून से. 14 व से. 15 या दोन सेक्टरच्या रस्त्यावर दरवर्षी दीड ते दोन फूट पाणी साचून त्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तेथे असणार्या वीजतारांमुळे पाण्यात प्रवाह उतरतो. ही बाब आम्ही सातत्याने निदर्शनास आणून देत असून तीन वर्षे आम्ही आपणाकडे पाठपुरावा करीत आहोत, पण या वर्षी आम्ही हे सहन करणार नाही. मे महिन्यापूर्वी या समस्या दूर होतील, अशी आशा बाळगतो, अन्यथा आम्ही सिडको कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper