Breaking News

आयएसएलचा कोलकाता विजेता

पणजी : वृत्तसंस्था

अ‍ॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा 3-1 असा पाडाव करीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसर्‍या विजेतेपदाला गवसणी घातली.

जेवियर हेर्नाडेझ (10व्या आणि 93व्या मिनिटाला), तर इडू गार्सिया (48व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले. चेन्नईयन एफसीकडून वालस्किस (69व्या मिनिटाला) याने एकमेव गोल केला. कोरोनाच्या भीतीमुळे गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर प्रेक्षकांविनाच अंतिम फेरीचा थरार रंगला.

एटीकेने हेर्नाडेझच्या गोलमुळे पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर गार्सियाने गोल करीत ही आघाडी वाढवली, पण वालस्किसच्या गोलमुळे चेन्नईने सामन्यात पुनरागमन केले. अतिरिक्त वेळेत हेर्नाडेझने

दुसरा गोल करीत एटीकेच्या विजयावर मोहोर उमटवली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply