
खोपोली ः बातमीदार
कोरोनाच्या दहशतीमुळे घरात बसून राहणार्या खालापूर आणि परिसरातील नागरिकांना महावितरणच्या गलथान कारभाराने जीव नकोसा झाला आहे. येथे आठवडाभरापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. उन्हाळ्यामुळे वाढते तापमान आणि सध्या कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मुलांनीसुद्धा कोरोनाच्या सुटीत मैदानाऐवजी टीव्ही आणि मोबाइलचा पर्याय मनोरंजनासाठी निवडला आहे, परंतु दिवसा वा रात्री कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होत आहे. रविवारी रात्री पाच तासांपेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित झाल्यावर सोमवारी सकाळपासून बत्ती गुल होती. सोमवारी चार तासांनंतर वीजपुरवठा सुरू झाला.