पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप युतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. चिपळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 24 मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजप युतीचे मंगेश पंढरीनाथ फडके, मीनाक्षी राजेंद्र फडके, रंजना रमेश पाटील, जयश्री गणेश म्हसकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाकडून अर्ज दाखल झाला नाही. या ग्रामपंचायतीत भाजप युतीच्या प्रचाराला वेग आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या
माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी जलदगतीने होत आहे. त्या अनुषंगाने भाजपाकडे जनतेचा ओढा वाढत असून सरपंचपदाच्या उमेदवार कविता संदीप शिद भरघोस मतांनी विजयी होऊन या ग्रामपंचायतीतही भाजप युतीचा झेंडा फडकणार असे चित्र दिसत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper