Breaking News

भाजप पदाधिकारी धावले सर्वसामान्यांच्या मदतीला; देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला कर्जत भाजपची साथ

कडाव ः वार्ताहर

देशातील व महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. त्यानंतर  अत्यावश्यक सेवासुविधा मात्र सुरू राहिल्या आहेत. सध्या राज्यातील गोरगरीब व ज्या मजुरांचा रोजंदारीवरच उदरनिर्वाह सुरू होता अशा सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दानशूर हात पुढे यावेत, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार सोमवारी कर्जत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव आदिवासीवाडी आणि किरवली ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी, पुलाचीवाडी, बामणोली, सावरगाव, चडोबावाडी येथील गोरगरीब व गरजू घटकांना किराणा मालाचे वाटप केले.

कोरोना महामारीचे महाभयंकर संकट आज संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनमान पूर्णतः विस्कळीत झाले असून एका वेळची पोटाची खळगी कशी भरणार, असा प्रश्न समाजातील काही घटकांसमोर उभा आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासन खंबीरपणे प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर याकामी काही सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कर्जत भाजपचे शहराध्यक्ष बळवंत घुमरे, सरचिटणीस प्रकाश पालकर, महिला शहराध्यक्षा सरस्वती चौधरी, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, ऋषिकेश जोशी, मयुर शितोळे, दिनेश भरकले यांनी कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव आदिवासी वाडीतील 54 कुटुंबांना तांदूळ, तेल, हळद, मसाला, डाळ, कडधान्य, साखर, चहापावडर, साबण आणि मास्कचे वाटप केले. तसेच भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, कर्जत तालुका चिटणीस राजेंद्र जाधव, उमरोली पंचायत समिती अध्यक्ष जयेश ठाकरे, महेश ठाकरे, सागर ठाकरे  यांनी किरवली ग्रामपंचायत हद्दीतील 150 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आज सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा सुसज्ज झाल्या आहेत. त्यामुळे आपणही सावधगिरीची भूमिका घेऊन आपल्या परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे. सर्व समाज घटकातील दानशूर हात सर्वसामान्यांच्या हितासाठी पुढे येत असल्याने भविष्यात कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही याची दक्षता सर्व भारतीय नागरिक घेत आहेत.-प्रकाश पालकर, सरचिटणीस, कर्जत शहर, भाजप

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply