Breaking News

कोरोनामुळे एकदरा राम मंदिरात शुकशुकाट

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूडच्या एकदरा राम मंदिरात रामनवमीनिमित्त दरवर्षी रामजन्मकाळ हा तालुक्यात सर्वात मोठा उत्सव होतो. 2000 भक्त खास जन्मकाळासाठी येतात, पण यंदा कोरोनामुळे गावकर्‍यांनी रामजन्मकाळ कार्यक्रम रद्द केला. सकाळी गावातील चार प्रमुखांनी रामाचे पूजन केले. सर्व गावकर्‍यांनी आपापल्या घरातून रामप्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा केला. रामनवमीनिमित्त मुरूड शहरातून निघणारी शोभायात्राही गावकर्‍यांनी कोरोनामुळे रद्द केली. सकाळी पूजनानंतर देवळाचे दरवाजे बंद करण्यात आले. गेली 60 वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे.कोकणातील शेतकर्‍यांचे गुढीपाडव्यापासून सण सुरू होतात. रामनवमी, हनुमान जयंती, गावागावात यात्रा, पण या सगळ्यांवर कोरोनाने पाणी फेरले आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply