उरण : उरणचे आमदार महेश बालदी यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या विधानसभा क्षेत्रात असलेल्या आदिवासी वाड्यांतील सहा हजार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधवांना तसेच इतर गरीब, गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची निकड भासत आहे. ती लक्षात घेता आमदार महेश बालदी यांनी उरण, खालापूर व पनवेलमध्ये असणार्या आदिवासी वाड्यांमध्ये तेल, मसाला, हळद आदी जेवणासाठी आवश्यक वस्तू दिल्या. भाजप कार्यकर्त्यांनी त्या वस्तू आदिवासी व गोरगरीब बांधवांपर्यंत पोहोचविल्या.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार बालदी यांनी योगदान दिले आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper