Breaking News

रिलायन्सकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांचे उत्पन्न बंद झाले असून त्यात या भागातील आदिवासी समाजालासुद्धा त्याचा फटका बसला आहे. अनेक आदिवासींच्या घरातील अन्नधान्य संपल्याने येथील रिलायन्स कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने विभागातील रोहे आणि पेण तालुक्यातील 25 आदिवासी वाड्यांवर जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचा शुभारंभ शनिवारी (दि. 4) रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे आणि सीएसआरचे अधिकारी अमित हर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील आयनावाडी आदिवासी वाडीत करण्यात आला. प्रत्येक कुटुंबाला साहित्याची पिशवी देण्यात येत असून त्यात तांदूळ, गोडेतेल, चवळी आणि डाळ यांचा समावेश आहे. 25 वाड्यांमधील एक हजार 121 कुटुंबांना हे साहित्य देण्यात येणार असून त्यात वणी ग्रामपंचायत हद्दीतील चेराठी, काळकाई, ढेपेवाडी, गोयंडावाडी, वरवठणे हद्दीतील कातकरवाडी, कुहिरे हद्दीतील कातकरवाडी, गंगावणे, सरेवाडी, चाफेवाडी, ओसलावाडी, धनगरवाडी, वरणावाडी, बंगालवाडी, आयनावाडी आणि चिखली, शिहू हद्दीतील बोरावाडी, शिहू कातकरवाडी आणि कडसुरे ग्रामपंचायत हद्दीतील किल्लावाडी, कागदावाडी, पायरवाडी, पारधीवाडी, नाईकवाडी, गायनीचीवाडी व झिमाडोह या आदिवासी वाड्यांचा समावेश आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply