Breaking News

पनवेल परिसरातील भाजप लोकप्रतिनिधींचे मदतकार्यात योगदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भाजपच्या वतीने गरीब, गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात हातभार लागावा, यासाठी पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी आपले आर्थिक सहकार्य दिले आहे.   

कोरोनाने मानवी आरोग्याबरोबरच एकूणच जगण्यावर परिणाम केला आहे. या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन आणि संचारबदीचा निर्णय घेण्यात आला आहे, पण त्यामुळे गोरगरीब कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. अशा काळात गोरगरीब उपाशी राहू नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक लोकप्रतिनिधी काम करीत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल परिसरातील अनेक लोकवस्त्यांमधील गरीब कुटुंबांना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे दिली जात आहेत. या पवित्र कामात आपणही योगदान दिले पाहिजे या सामाजिक भावनेने प्रभाग 14 ते 20मधील नगरसेवकांनी आर्थिक योगदान देऊ केले आहे.

 यामध्ये नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी एक लाख 50 हजार रुपये, अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे, एकनाथ गायकवाड, संजय भोपी व संतोष शेट्टी या नगरसेवकांनी प्रत्येकी 30 हजार रुपये, माजी नगराध्यक्ष व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी 25 हजार रुपये, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत व हेमलता म्हात्रे यांनी प्रत्येकी 15 हजार रुपये, नगरसेवक विक्रांत पाटील यांनी 10 हजार रुपये, नगरसेवक अजय बहिरा व नगरसेविका राजेश्री वावेकर यांनी प्रत्येकी सात हजार 500 रुपये, तर नगरसेविका चारुशीला घरत यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply