
भारताचे सर्व नागरिक ज्यामध्ये 70 टक्के ग्रामीण भाग असणार्या भागात लहान मुले, वृध्द किंवा हॉस्टेलमध्ये राहणारी लोक जी आता लॉकडाऊनमध्ये आहेत, त्यांच्यासाठी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एक चिकित्सक होण्याच्या नात्याने मी काही सांगू इच्छिते. जे तुम्ही आरामात आपल्या घरामध्ये करू शकता. आपल्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवून आपण कोरोना व्हायरसपासून वाचू शकतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवा + प्रथिने थेरपी
1) हळद पावडर + गरम दूध (रोगप्रतिकारशक्ती आणि विरोधी दाहक वाढ.) 2) काळीमिरी, तुळशीची पाने आणि सुंठ, दालचिनी हे सर्व बारीक ठेचून एक चमचा असे प्रमाण घेऊन पाण्यात उकळवायचे व त्यामध्ये अर्धा लिंबू रस टाकून हर्बल टीसारखे हे मिश्रण दिवसातून दोन वेळा सेवन करा. 3) दोन दोन तासांनंतर तुळशीची पाने किंवा लवंग पाण्यात उकळवून त्या पाण्याचे सेवन करा. 4) मूगडाळ जी पचायला हलकी असते आणि त्यामध्ये उच्च प्रथिने असतात जी आपल्या शरीराचे स्नायू बळकट करतात. आपला देश पंतप्रधानांच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करतो, जे प्रगतीशील देश असल्याचे दर्शविणारे आहे. जर सर्व भारतीय त्याचे पालन करीत राहिलो तर प्रत्येक संकटातून मुक्त होऊ. जैविक संकट साथीच्या आजाराच्या वेळी उद्योजक मुकेश अंबानी हे रुग्णालय व वैद्यकीय उपकरणाच्या निर्मितीत उतरले आहेत, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या वेळी प्राधान्य स्थानावर देशाला आवश्यक काही वैद्यकीय उपकरणे कमी आहेत. यात 1) पेसमेकर-हृदयाचे ठोके नियंत्रित करते, 2) वेंटिलेटर, 3) इकोमो मशीन, 4) इच्नो मशीन यांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनावर कोणतेही औषध किंवा लस अजून सापडली नाही. काही लोकांनी लसूण खाल्ल्याने कोरोनाची लागण टाळू शकतो, असे मत व्यक्त केल्याने बर्याच लोकांनी त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. कोरोनासाठी हे उपायकारक ठरेल का? लसूण हृदय समस्या, रक्ताला पातळ करणे आणि हृदयातील रक्त परिसंचरण योग्य ठेवते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. ज्यांनी मला प्रोत्साहित केले ते शास्त्रज्ञ एनबीआर, बीएआरसी आणि पीएचडीला मार्गदर्शन केले, या सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. आम्ही या रोगाची वैद्यकीय उपचार पध्दती शोधण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आम्ही सर्व जण आवाहन करतो की, या कार्यात आम्हाला सहकार्य करा.
–डॉ. अंजना म. कुलकर्णी, बीएससी. एमडी (आयुर्वेद) पीएचडी (सायकोलॉजी), एअर इंडिया, पोलीस कमिश्नर पोलीस हॉस्पिटल, मुुंबई. ई-मेल आयडी – Amk0709@gmail.com
RamPrahar – The Panvel Daily Paper