Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 14) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती जगभरातील आंबेडकरी अनुयायांनी आपापल्या घरात साजरी केली. बौद्ध समाज युवा संघ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासकीय, पोलीस, आरोग्य, सफाई व इतर सर्व निगडित कर्मचार्‍यांना जयंतीनिमित्त बिस्कीट पुडे, पाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले. या वेळी बौद्ध समाज युवा संघ संस्थापक रमेश शिंदे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, तालुका अध्यक्ष रवींद्र गायकवाड, रोहा तालुका खजिनदार सुविनय अहिरे, महिला विभाग कार्यकर्त्या प्रियंका कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते रामदास सुरळकर सहभागी झाले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधी बौद्ध समाज युवा संघाच्या वतीने रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत जेवण व गरजूंना धान्यवाटप करण्यात आले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply