पाली : प्रतिनिधी
राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्ण व मृतांची वाढती संख्या लक्षात घेता सुधागडवासीय कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले असून, पालीसह अन्य बाजारपेठा 15 व 16 एप्रिल अशा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण तालुके वगळता अन्यत्र कोरोनाचे रूग्ण आढळून आले नसले तरी जीवनावश्यक वस्तू, औषधे खरेदी करण्यासाठी पालीत गर्दी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुधागड तालुका व्यापारी असोसिएशन, लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी बाजारपेठेत होणार्या गर्दीवर निर्बंध आणण्यासाठी बुधवार व गुरुवार या दोन दिवशी सुधागडात पूर्णत: लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंदमधून अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत.
नागरिकांनी घरात राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जनता कर्फ्यूला बुधवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper