पेण : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असताना दुसरीकडे काही अतिउत्साही नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी खरेदीसाठी किंवा आपल्या परिसरात नागरिक गर्दी करून उभे राहत असल्याने अशांना रोखणे पोलीस प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. यावर उपाय म्हणून पेण पोलीस नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेणार आहेत.
अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करून असतात. पोलिसांची गाडी लांबूनच दिसल्यावर अनेक जण एखाद्या गल्लीबोळात पळून पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यात यशस्वी होत असतात. अशा बेफिकीर नारिकांचा ड्रोनच्या सहाय्याने माग काढून पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वेडे, उपनिरीक्षक महेश कदम, उपनिरीक्षक नितीन पाटील यांनी याबाबतची चाचपणी केली.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper