मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3100वर पोहोचला आहे, तर आतापर्यंत 300 लोक या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत राज्यात 194 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे. 83 टक्के मृतांना दुर्धर आजार होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ज्यांचे मृत्यू झाले आहेत त्यांचे ऑडिट होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper