मोहोपाडा : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला सात महिन्यापांसून धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तळवली दांडवाडी येथे घडली आहे. पीडिता गभर्वती राहिल्याने हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी वाडीतीलच आरोपी रोहिदास राम वाघे-पवार
(वय 21) याच्याविरोधात रसायनी पोलिसांनी पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
खालापूर तालुक्यात तळवली दांडवाडी येथील अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारी राहणारा रोहिदास वाघे याने सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या काळात दांडिया खेळताना फूस लावली व तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतरही रोहिदासने पीडित मुलीला मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. पीडिता गरोदर राहिल्याचे तिच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी रोहिदासविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी रोहिदासला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुजाता तानवडे अधिक तपास करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper