Breaking News

लढवय्या हरपला; मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी (दि. 17) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. साधे राहणीमान असलेल्या पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशके आपला दबदबा राखला. गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्री पद सांभाळण्याचा त्यांना बहुमान मिळाला. त्यानंतर 2014मध्ये देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पर्रिकर गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर त्यांची झुंज संपली. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. मान्यवरांनी त्यांच्याप्रति श्रद्धांजली वाहिली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply