Breaking News

उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर लांबच लांब रांग

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील पारप्रांतीय मजुरांना गावा कडची ओढ लागली असून त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी वैद्यकीय दाखल्यांची जरुरी असते. वैद्यकीय दाखल्यासाठी सोमवार

(दि. 4) पासून उरण येथील पालवी हॉस्पिटल व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय समोर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. पालवी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश पाटील यांनी दररोज सुमारे 200 ते 33 प्रमाणपत्र मोफत सेवा म्हणून

दिले आहेत.

दुसर्‍या लॉकडाऊनच्या समाप्तीनंतर सरकारने दिलेल्या निर्देशानुसार उरण तालुक्यातील परप्रांतिय मजूर व अन्य राज्यातील रहिवासी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या सर्वांना आपापल्या गावाला जाण्यासाठी सरकारने वाहनांची व्यवस्था केली असली तरी येथून जाण्यापूर्वी फिटनेसचे वैद्यकीय प्रमाणपत्र नेणे आवश्यक असल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याकरिता परप्रांतीयांनी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व पालवी हॉस्पिटल येथे रांगा लाऊन मिळवावे लागत आहे.

फिटनेस वैदकीय प्रमाणपत्र देण्यासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, उरण मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष संजीव म्हात्रे, बाळरोग तज्ञ अजय कोळी, पालवी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश पाटील, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रज्ञा भगत, मृणालिनी कदम, संजोगी भोईर, स्टाफ सहकार्य करीत आहेत.

सोमवारी 598, मंगळवार (दि. 5) रोजी 620 व बुधवारी (दि. 6) रोजी 610 परप्रांतिय यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रमाण पत्र दिले जात आहे. त्यात युपी, एमपी, बिहार अशा ठिकाणी जाणारे परप्रांतिय आहेत, अशी माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्नालायाचे वैद्कीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी दिली.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply