Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

पेण ः प्रतिनिधी

पेणमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याच्या अफवेमुळे एकच गोंधळ उडून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत, तसेच शेकडो गाड्याही मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करीत आहेत. पेण तालुक्यात अद्याप कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही तालुक्यात कोरोनाबाबतची काळजी घेण्यात येत आहे. अलिबाग किंवा दुसर्‍या तालुक्यातून कोरोना संसर्ग झालेला रुग्ण पेण तालुक्यात येऊ नये यासाठी डीवायएसपी नितीन जाधव यांच्या आदेशाने खारपाडा महामार्गावर पोलीस निरीक्षक पवार यांच्याकडून येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तपासणी तसेच गाड्यांचे नंबर व नावांची नोंद करून दुसर्‍या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून येणार्‍या वाहनांना बंदी करण्यात येत आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply