Breaking News

चित्त तिचे पिलांपाशी

ताई माझी दोन लहान मुले पुण्याला आहेत. ती काय खात असतील कशी राहत असतील मला त्यांना भेटायचे आहे. मला पुण्याला जायला मदत कर अशी आर्जव फोनवरून ती महिला करीत होती. नवी मुंबईच्या माया नगरीत अडकलेली ती पुण्याहून काँट्रॅक्टवर आली होती आणि लॉकडाऊनमुळे ती पुण्याला जाऊ शकत नव्हती. येथे स्वत: अर्धपोटी असली तरी तिचे चित्त मात्र तिच्या पिलांपाशी होते. 

कोरोना विषाणूच्या प्रकोपाने जगभरात अहाकार माजला आहे. सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ज्यांचे हातावरचे पोट होते ते खुपच हैराण झाले आहेत, उपासमारीमूळे अस्ताव्यस्त झाले आहेत. रोजंदारीवरील कामगार, मजूर, आदिवाशी आणि झोपडपट्टीतील नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष आणि शासन त्यांना अन्नधान्याबरोबरच जेवणाच्या पाकीटांचे वाटप करीत आहे. शासनाने परराज्यातील कामगारांना आपल्या गावाला पाठवण्याची सोय ही केली आहे. पण मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलच्या माया नगरीत असा एक वर्ग आहे. त्यांच्यापर्यंत ही मदत पोहचतच नाही आणि तो मागू ही शकत नाहीत. कारण तो आपली ओळख देऊ शकत नाही. तो वर्ग म्हणजे बार गर्ल्स आणि सेक्स वर्करचा.

लॉक डाऊनमुळे बार बंद झाले. त्यामुळे या मुलींचे उत्पन्न बंद झाले. त्यांच्या जीवावर कमवून बसलेला बार मालक यांना फुकट कशाला मदत करेल. या मुली ज्या गावात किवा सोसायटीत राहतात त्या ठिकाणी ओळख लपवून रहात असल्याने त्यांना शासनाकडून आलेली किवा स्वयंसेवी संस्थांकडून आलेली मदत घेण्यासाठी रांगेत उभे राहता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. बारवर बंदी आल्यावर अनेक मुलींनी आपले कुटुंब चालवण्यासाठी काँट्रॅक्टवर जायला सुरुवात केली. येथील मुली पुणे, नागपूर सूरत आणि अहमदाबाद सारख्या शहरात काँट्रॅक्टवर जातात आणि तिकडच्या इकडे येतात.       

या मुलींना काही हजार रुपये देऊन 17 ते 30 दिवसाच्या काँट्रॅक्टवर दलाल घेऊन येतात. अशापैकीच एक स्वयंसेवी संस्थेत काम करणार्‍या ताईला  माझी दोन लहान मुले पुण्याला आहेत मला पुण्याला जायला मदतकर अशी आर्जव करीत होती. तिची दोन लहान मुले शेजार्‍यांकडे ठेवून ती आली होती आणि काँट्रॅक्ट संपले पण लॉकडाऊन घोषित झाल्याने ती अडकली होती, जवळचे पैसे ही संपले होते. त्यामुळे उपासमार आणि मुलांची काळजी तिला सतावत होती. तिचा राहण्याचा पत्ता नसल्यान तिला शासकीय मदत पोहचत नव्हती की घरी जाता येत नव्हतं.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply