खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर शीळफाटा येथे शनिवारी (दि. 16) दुपारी तेल टँकरच्या झालेल्या विचित्र अपघातात चालकाचा जागीच मृत्यू, तर चार जण जखमी झाले. टँकरने पुढे जाणार्या ट्रकला ठोकर मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा असलेला अन्य एक ट्रक, पिकअप, कार व दोन दुचाकींचे नुकसान करून हा टँकर उलटला.
करसनजीत ठाकूर (वय 55, रा. ओडिशा) असे मृत चालकाचे नाव असून, रितेश ठाकूर (21), महम्मद खान, (24) बहादूर राम (53) गोरखनाथ पवार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …