Breaking News

‘जीवनज्योत’ने भागवली वृद्धाश्रमाची तहान

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुका निसर्गाने समृद्ध असला तरी उन्हाळ्यात येथे पाण्याचे भीषण संकट उभे राहते. आदिवासीबहुल भाग असलेल्या तालुक्याच्या अनेक भागांत पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शिलार गावाजवळ असलेल्या वृद्धाश्रमात बोअरिंगची भूजल पातळी आटल्याने येथील वृद्धांना जल संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तहानलेल्या वृद्धांच्या मदतीला जीवनज्योत सामाजिक संघटना पुढे येते. दरवर्षी संघटनेकडून येथील वृद्धाश्रमात पाण्याचा टँकर पोहचविला जातो.

शिलारजवळील प्रेम कुटीर वृद्धाश्रमातील सदस्यांसाठी कूपनलिकेची व्यवस्था करण्यात आली, मात्र उन्हाळ्यात येथील पाणी पातळी घटल्याने बोअरवेलला पाणी येत नाही. परिणामी येथील वृद्धांची पाण्यासाठी तळमळ होते. या वृद्धांची व्यथा लक्षात घेऊन उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडेपर्यंत जीवनज्योत सामाजिक संस्थेकडून येथे पाण्याचे टँकर पुरवले जातात. अनेक वर्षे जीवनज्योत संस्थेच्या माध्यमातून ही सेवा अविरत सुरू आहे. यंदाही प्रेम कुटीर वृद्धाश्रमात पाणीसमस्या उद्भवल्याने आश्रमाच्या संचालक मामी यांनी जीवनज्योतच्या सदस्यांना फोन करून आश्रमात पाणीटंचाईमुळे वृद्धांचे होत असलेले हाल सांगून पाण्याचे टँकर देण्याची विनंती केली. संस्थेचे सचिव राजेश गायकवाड यांनी आपल्या सहकार्‍यांना ही बाब सांगून अध्यक्ष प्रकाश गायकवाड, कोषाध्यक्ष संदेश कदम, उपाध्यक्ष त्रिगुनेश जोशी, सहसचिव केदार बोरवणकर, सल्लागार शिल्पा पळणीतकर, मेधा मठकरी या सर्वांनी पाऊस पडेपर्यंत एक दिवसाआड एक पाण्याचा टँकर आश्रमात टाकण्याचा निर्णय घेतला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply