Breaking News

आष्टे लॉजिस्टिक कंपनी बंद ठेवण्याचे आदेश

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील आष्टे लॉजिस्टिक कंपनीतील आठ कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पनवेलच्या तहसीलदारांनी शनिवार

(दि. 22) पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून पुढील आदेश देईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पनवेलमध्ये कोरोनाग्रस्त  रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तालुक्यातील कसळखंड, वहाळ आणि आष्टा येथील रुग्णांची संख्या देखील वाढत असून त्यातील बहुसंख्य व्यक्तीं आष्टे लॉजिस्टिक कंपनीत कामाला असल्याचे दिसून आले आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा असा निष्कर्ष निघाला आहे.  आष्टे लॉजिस्टिक कंपनीतील आठ कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी ही कंपनी बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शनिवारी पनवेल तहसीलदारांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील आदेश देईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे व्यवस्थापनाला आदेश दिले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply