Breaking News

पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांवर पुष्पवर्षाव

नगरसेविका कुसुम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

कळंबोली : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून पालिका स्वच्छता दुत योद्यांचे मोठे योगदान आहे. या सफाई कामगारांवर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसूमताई गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पवृष्टी करण्यात आली. तर या स्वच्छता दुताना नगरसेविका कुसूम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व महानगर पालिकेचे अधिकारी अनिल कोपरे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संकटातही स्वच्छता कर्मचार्‍यांनी आपले काम सुरू ठेवून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. दुत डोर टु डोर जावून कचरा संकलित करणे. पालिका हद्दीतील रस्ते फुटपाथ साफ करणे, पावडर फवारणी करणे, सोसायटीत जंतनाशक फवारणी करून निर्जंतुकिरण करणे सबंधित कामे स्वच्छता दुत करत आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून नगरसेविका कुसूम पाटील व माजी उपनगराध्यक्ष यांनी कामगारांना वेळोवेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तू, नाश्ता, पाणी, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले आहे.

नगरसेविका कुसूम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगपालिकेच्या स्वच्छता दुतांवर सोमवारी पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच त्यांना पंधरा दिवस पुरेल असे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोशल डिस्टन्सिंग ठेवून महानगरपालिकेचे अधिकारी अनिल कोपरे, प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी दौलत शिंदे, मनोज चव्हाण, राहुल जाधव, ठेकेदार राकेश भुजबल, गोपीनाथ लोखंडे, राजू महापूरकर, हरिभाऊ ठाकूर, हनुमंत गवळी, तुकाराम कुरले, मुरलीधर शिंदे, अनंत मोगरकर, सुरेश खानविलकर आदी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply