Breaking News

पनवेल पोलीस ठाण्याच्या तीन कोविड योद्ध्यांची कोरोनावर मात

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे चार योद्धे हे नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नवी मुंबई येथील डि. वाय. पाटील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन योद्धे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. तर एक योद्धा येत्या एक-दोन दिवसात घरी परतेल.

पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील चार कर्मचार्‍यांना साधारण महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याने व त्यात ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना नवी मुंबई येथील डॉ. डि. वाय. पाटील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी पूर्ण उपचार घेऊन ते आता घरी परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील तीन योद्धे घरी परतले आहे. तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ रणदिवे हा सुद्धा कोरोनावर मात करून कामोठे येथील सेक्टर 8 येथे महावीर वास्तू या आपल्या निवासस्थानी परतले.

या वेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्याच्या घराच्या प्रांगणात जाऊन उपचार घेऊन सुखरूप परतल्याबद्दल त्याच्यावर पुष्पवृष्टी करुन त्याचे स्वागत केले. लवकरच पुन्हाकर्तव्य बजाविण्यासाठी आमच्यात सामिल हो असे आवाहनही या वेळी केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply