नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांचे परिश्रम
पनवेल : वार्ताहर – निसर्ग वादळाचा फटका पनवेल शहरालासुद्धा बसून मोठ्या प्रमाणात वृक्षे उन्मळून पडली होती. त्यामुळे बुधवारी (दि. 3) सकाळी 11.30 वाजता विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तो विद्युत पुरवठा काही भागात 26 तासांनतर सुरू झाला. शहरातील पायोनियर विभागातील विद्युत पुरवठा अशाचप्रकारे खंडित झाला होता. त्यावेळी स्थानिक नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांशी संपर्कात राहून तो वीज पुरवठा सुरळीत करून घेतला.
शहरातील अनेक भागांसह पायोनियर विभागात असलेल्या सारस्वत बँकेजवळील बदामाचे झाड तुफानी पाऊस व वार्यामुळे रस्त्यावरच उन्मळून पडले. त्यामुळे अनेक वीजेच्या लाईन खंडीत झाल्या. मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना काम करणे कठीण झाले होते. या वेळी झाड कटरने कट करून जेसीबीचा वापर करून खाली पडलेले झाड पूर्णतः बाजूला करण्यात आले व वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने मध्येच ब्रेक झालेल्या विद्युत वाहिनी व इतर तांत्रिक कामे पूर्ण करण्यात संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचार्यांना 26 तास लागले.
या वेळी स्थानिक नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांनी पूर्णतः मदत केली. तसेच प्रभागातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर व मेसेजद्वारे रहिवाशांनासुद्धा वारंवार या कामाची माहिती हे दोन्ही नगरसेवक देत होते. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी त्यांचे कौतुक केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper