Breaking News

वटपौर्णिमेवरही कोरोनाचे सावट; महिलांनी केले घरातच पूजन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडून परिसरातील वटवृक्षाचे पूजन करण्याऐवजी बहुतांशी महिलावर्गाने स्वतःच्या घरातच वटसावित्रीचे पूजन केल्याचे चित्र नवीन पनवेल परिसरात पहायला मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कोणतेही सण, उत्सव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच करण्यात यावे अथवा घरात करण्यात यावे असे आवाहन असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत काही महिलांनी वटपौर्णिमेला स्वतःच्या घरातच वडाचे चित्र, रांगोळी किंवा कुंडीत वडाचे नवीन रोपटे लावून त्याचे पूजन केले.

तसेच काही सोसायटींच्या आवारातही वडाचे रोप कुंडीत लावण्यात आले. तेथेही महिलांनी एकत्र येवून तोंडावर मास्क लावून तसेच योग्य अंतर राखत वडाचे पूजन केल्याचे पहायला मिळाले.

वडाच्या तोडलेल्या फांद्यांचे पूजन न करण्याविषयी जनजागृती काही संस्थांनी केली होती त्यालाही प्रतिसाद देत काही महिलांनी वडाचे रोप कुंडीमधे ंलावून पूजन केले. काही ठिकाणि मोकळ्या जागेवर वटवृक्षारोपण करून महिलांनी त्याचे पूजन केले.

……………………………………………………………………………

उरण : वार्ताहर

वटपौर्णिमा शुक्रवारी (दि. 5) असल्याने वटवृक्षाची पूजा करण्यासाठी उरण शहर सह ग्रामीण भागात महिलांची लगबग दिसत होती. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. त्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने काही महिलांनी  आपल्या घरीच फुलांच्या कुंडीत वडाची फांदी लाऊन पूजा  केली तर काही महिलांनी सोशल डीस्ट न्सिंग ठेऊन वट वृक्षाची पूजा केली. वडाला फेरीमारल्यानंतर महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू करून वाण म्हणून फळे प्रसाद दिले एकमेकींना शुभेच्छा दिल्या.

उरण शहरात मोरा साई बाबा मंदिराजवळ, बोरी नाका, द्वारका नागरी (बोरी), कोट गावं राघोबा मंदिर जवळ, देऊळवाडी शंकर मंदिर समोर, कामठा येथे भिवंडीवाला गार्डन, नागाव, केगाव, माणकेश्वर मंदिर समोर, बोरी पार कुंभारवाडा आदी ठिकाणी पूजा केली.

कोरोना संकटामुळे संसर्गाचा पादुर्भाव होऊ नये या करिता महिलांनी सोशल डिस्टन्सिंग ठेऊन महिलांनी वट वृक्षाची पूजा केली. यंदा फणसाचे गरे पूजेसाठी मिळाले नाहीत जी बाजारात उपलब्ध फळे आहेत ती फळे पूजेसाठी वापरली. कोरोना संकट मुळे काही महिलांनी घरीच पूजा केली.

– दीपमाला कोळी, मोरा

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply