Breaking News

शेतीकामांबाबत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन; रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार

कर्जत ः बातमीदार

निसर्ग चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या नैसर्गिक स्थितीत शेतकर्‍यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, शेतीची कामे करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. रिलायन्स फाऊंडेशन रायगड जिल्हा शाखेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी ध्वनी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकर्‍यांसाठी रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक तेजस डोंगरीकर आणि शैलेश भोईर यांनी या ध्वनी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले.

 कृषी क्षेत्रात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या महिती सेवा विभाग तसेच राज्य सरकारचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग चक्रीवादळानंतर करावयाच्या शेती नियोजनासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. ध्वनी चर्चासत्र स्वरूपात असलेल्या या शेतीविषयक कार्यक्रमात रायगड व पालघर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. चक्रीवादळ होण्याआधी रिलायन्स फाऊंडेशनकडून संभाव्य धोक्याबाबत माहिती देणारे चर्चासत्रही आयोजित केले होते. डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. विलास जाधव यांचे मार्गदर्शन रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा व कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. निसर्ग चक्रीवादळानंतर करावयाचे शेतीचे नियोजन, डहाणू, पालघर तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत तालुक्यात झालेला वारा तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे भात खाचरात साचलेल्या पाण्याचे बीज पेरणीच्या वेळी करावयाचे नियोजन कसे असावे, बियाणे बीजप्रक्रिया आणि फळबागा आदींबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply