
उरण : वार्ताहर
उरण तालुका भाजप महिला अध्यक्षा अॅड. राणी म्हात्रे यांनी उरण पूर्व विभागातील पदाधिकारी यांच्यासह आमदार महेश बालदी यांची शनिवारी (दि. 6) भेट घेतली. या वेळी त्यांनी उरण पूर्व विभाग आठ गाव पाणी प्रश्नाबाबत चर्चा करून निवेदन दिले. म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनाडे धरणातील लिकेज व फिल्टरेशन करणे व हेटवणे पाणी पुरवठा वाहिनी मिळावी, उरण पूर्व विभाग आठ गावं पाणी पाणी प्रश्न सुटावा असे नमूद करण्यात आले आहे. आमदार महेश बालदी यांनी निवेदन स्वीकारून या विषयी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
या वेळी अॅड. राणी सुरज म्हात्र यांच्या समवेत गोवठणे गावं कार्याध्यक्ष सुरज म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, तालुका चिटणीस कुलदीप नाईक, युवा चिटणीस पंकेश म्हात्रे, अमित म्हात्रे, पिरकोन गावं अध्यक्ष प्रमोद म्हात्रे (सर), कोप्रोली महिला अध्यक्षा निशा म्हात्रे, गोवठणे महिला अध्यक्षा विश्रांती म्हात्रे, वशेणी गावं अध्यक्ष कृष्णा ठाकूर, पुनाडे गावं अध्यक्ष लवेश पाटील, युवा कार्यकर्ता कल्पेश म्हात्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper