Breaking News

खोपोलीत भाजपतर्फे मोदी सरकारच्या वर्षपूर्तीकाळ पत्राचे घरोघरी वितरण

खोपोली : प्रतिनिधी – मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मचा वर्षपूर्तीकाळ यशस्वी पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेश पत्रकाचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे.

खोपोलीतही विविध प्रभागात या संदेशपत्राचे वाटप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केले. खोपोलीत जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील, खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, परिवहन सभापती तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे, उपाध्यक्ष चंद्रप्पा अनिवार, कृष्णा पाटील, संभाजी नाईक, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, ईश्वर शिंपी, गोपाळ बावसकर, राहुल जाधव, अनिल कर्णूक, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा शोभाताई काटे, स्नेहल सावंत, अश्विनी अत्रे, रसिका शेटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, चिटणीस विनायक माडपे, सिद्धेश पाटील, संतोष चौधरी, संजय म्हात्रे, यांसह अनेक कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभाग घेत पंतप्रधान मोदी यांच्या संदेश पत्राचे वितरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती मोदी यांनी या पत्रात जनतेशी हितगुज करीत नमूद केली आहे.

  महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी कारमेल स्कुल परिसरात सॅनेटायझर व मास्कचे याचवेळी वाटप केले. या अभियानाचा समारोप 15 जून रोजी झाला. यानिमित्ताने आत्मनिर्भर भारतासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे अश्विनी पाटील यांनी सर्वाना आवाहन केले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply