Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून विकासकामे, नालेसफाईची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांची तसेच नालेसफाईची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह मंगळवारी (दि. 16) पाहणी केली.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने आणि सिडकोने कोणती कामे केली पाहिजेत याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आठवड्यापूर्वी प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवकांजवळ चर्चा केली होती. त्यानुसार अधिकार्‍यांना काम करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मधील गावदेवी पाडा, महाराष्ट्र बँक, एमटीएनएल रोड या परिसरात गटार व नालेसफाई, स्वच्छता तसेच गटारांच्या बांधणीचे काम सुरू आहे. या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली आणि अधिकारी व कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply