पनवेल ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या रोह्यातील निलीकॉन फूड डाईज अॅण्ड केमिकल्स कंपनी युनिट नंबर 1 व 2 आणि सुदर्शन इंडस्ट्रीजमधील 300 कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जय भारतीय जनरल कामगार संघटना व भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी दक्षिण रायगड यांच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष तसेच कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, युवा नेते अमित घाग, संघटनेच्या कार्यालयीन सचिव समिरा चव्हाण, संघटनेचे संघटक रवींद्र कोरडे, जिल्हा संघटक विवेक अभ्यंकर, कामगार आघाडी रोहा तालुका अध्यक्ष प्रवीण
शिर्सेकर, संघटनेचे रोहा तालुका संघटक गणपत काजारे, सुयश ठाकूर व रोहा तालुका कामगार आघाडी कार्यकर्ते सुधाकर शिलधनकर, राजेश हजारे आदी उपस्थित होते.
प्रत्येक कामगारास तांदूळ, तूरडाळ, गोडेतेल, कांदा-बटाटे, तिखट मसाला, हळद आदी अन्नधान्य देण्यात आले. या कार्यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बहुमोल मदत केल्याचे जितेंद्र घरत यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
Check Also
भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही
आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …