पनवेल : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वाढत्या कोरोना रुग्णांकरीता पनवेलमधील मोठी हॉटेल्स ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विविध रुग्णालयीन उपकरणे लावण्यात यावे. तसेच तेथे बेड्सचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे निवेदन दिले आहे.
निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटल्समधील बेडस कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुढील काळामध्ये रुग्णांना उपचाराकरीता बेडस मिळणे अत्यंत आवश्यक असल्याने पनवेल तालुका व महानगरपालिका हद्दीतील मोठी हॉटेल्स ताब्यात घेऊन रुग्णांची सोय करणे आवश्यक आहे. त्याठिकाणी विविध उपकरणे लावुन ती रुग्णांकरीता खुली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper