Breaking News

कोरोना रुग्ण आढळल्यास तातडीने इमारत सील करावी

नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी

पनवेल : बातमीदार

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना पेशंट आढळल्यानंतर तातडीने सदरील इमारत सील करण्याबाबतची मागणी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार शंकर भगत यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संपूर्ण जगभर कोरोना या रोगाने थैमान घातले असून अनेक नागरिकांना याची बाधा होऊन ते मृत्युमुखी पडत आहेत. पनवेल परिसरात देखील कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढीस लागलेले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सद्यस्थितीत दररोज 80 ते 90 रुग्ण परिसरात आढळून येत आहेत त्यामुळे या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पायबंद घालण्याचे प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहेत.

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर तो ज्या इमारतीत वास्तव्यास आहे ती इमारत सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवसानंतर सील केली जात असल्याने त्यातून नेमका उद्देश साध्य होत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यानंतर तो ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे, ते ठिकाण आणखी काही रुग्णांना त्याची बाधा होऊ नये याकरिता तातडीने सील करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केली आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply