खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील कोविड रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या घरी जेवण बनविण्यासाठी कोणी नसेल किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेल अथवा त्यांच्या घरी छोटी मुले किंवा वृद्ध व्यक्तींना जेवणाची गैरसोय होत असेल तर त्यांच्यासाठी घरपोच
निःशुल्क जेवण पाठविण्याची व्यवस्था सहजसेवा फाऊंडेशनने केली आहे.
दुपारच्या जेवणासाठी दुपारी 11.30 वाजेपर्यंत व रात्रीच्या जेवणासाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कळवावे, असे आवाहन सहजसेवा फाऊंडेशन, खोपोली यांनी केले आहे. त्यासाठी आयुब खान, खोपोली 9225775877, राजेंद्र फक्के, शिळफाटा 9370690455, मोहन केदार, शिळफाटा 7887370008, मुस्तुफा दुस्ते, हाळ 9049417866, सुरज पाटील, ढेकू 8149314353, संदीप पाटील, आतकरगाव 9326411375, विकी भालेराव, खालापूर 9209304793 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी विमलनाथ जैन संघ खोपोली, खोपोली परळी जांभूळपाडा लोहाना समाज, यशवंत लक्ष्मण साबळे, हास्य क्लब खोपोली, लायन्स क्लब ऑफ खोपोली, रोटरी क्लब ऑफ खोपोली, खालापूर तालुका केमिस्ट असोसिएशन, खिदमते खल्क सामाजिक संस्था, खोपोली, खोपोली बिल्डर असोसिएशन, खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट, बाबूमामा जाधव सामाजिक प्रतिष्ठान खोपोली, नंदकिशोर ओसवाल यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. वर्षा मोरे, सलीम लोगडे, प्रदीप खंडेलवाल हे उपक्रम प्रमुख म्हणून काम पाहतील. कोविडमुळे रुग्ण अॅडमिट असलेल्या गरजू कुटुंबांना याचा लाभ होईल. यासाठी सर्वांनी मिळून या उपक्रमात आपले योगदान द्यावे, असे आवाहन सहजसेवा फाऊंडेशन, खोपोलीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper