अलिबाग ‘रोटरी’चा पदग्रहण सोहळा

डॉ. किरण नाबर यांची अध्यक्षपदी निवड

अलिबाग : प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरच्या अध्यक्षपदी डॉ. किरण नाबर यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष जगदिश राणे यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सचिवपदी निमिश परब यांची, तर खजिनदारपदी डॉ. राजेंद्र चांदोरकर यांची नियुक्ती झाली आहे.

कार्यकारीणीचा पदभार समारंभ झुम मिटींगच्या माध्यमातून झाला. या वेळी पदाधिकारी आणि मेंबर्स यांना नियुक्तीपत्र, सनद व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील एक आदिवासी वाडी दत्तक घेऊन तेथे आरोग्य तपासणी कॅम्पचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, नेत्रदान,

अवयवदान तसेच घातक आजारांबाबात जनजागृती करणे यासारखे वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत, तर गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध कामांची माहिती या वेळी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून देण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. राजश्री चांदोरकर यांनी केले, तर आभार खजिनदार व पुढील वर्षाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी केले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply