पनवेल ः बातमीदारमागील चार-पाच दिवसांपासून पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने पनवेल तालुक्यातील शेतकर्यांनी लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढावल होते, मात्र मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आणि शेतात भरपूर प्रमाणात पाणी झाले. त्यामुळे पनवेल तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या कुटुंबासह शेती लावणीला सुरुवात केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात कामधंदे बंद असल्याने शेतकर्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही तरुणांनी शेतीची कास धरली आहे. 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात सर्वच व्यवहार कोलमडले असताना शेतकरीराजा पावसाळी शेती हंगामात कार्यमग्न झाला आहे.
Check Also
उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …
RamPrahar – The Panvel Daily Paper