पोलादपूर : प्रतिनिधी
कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी (दि. 10) दुसर्या दिवशीही ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. या दरम्यान मातीचा ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर 18 तासांनी महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले.
मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ गुरुवारी रात्री 8च्या सुमारास दरड रस्त्यावर आली होती. सुमारे 200 मीटर लांब इतका हा मातीचा ढिगारा होता. जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलीस तसेच एल अॅण्ड टी कंपनीचे कर्मचारी माती हटविण्याचे काम करीत होते, मात्र पावसामुळे तिथे चिखल झाल्याने कामाला उशीर लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक म्हाप्रळ, आंबेत तसेच तुळशी खिंडमार्गे वळवण्यात आली होती. सायंकाळी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper