उरण : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यात 13 जुलैपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनासाठी उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उरण येथील मल्लिनाथ श्री होद्लूरे या तरुणाच्या वतीने 13 जुलैपासून चहा वाटप करण्यात येत आहे.
उरण शहरातील उरण चारफाटा, गणपती चौक, राजपाल नाका, आदी ठिकाणी कडक पोलीस नाका, वैष्णवी हॉटेल आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या बंदोबस्तात पोलीस निरीक्षक (गुन्हे )अतुल आहेर, पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर, पोलीस उपनिरीक्षक विलास कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस हवालदार गणेश पाटील, ट्राफिकचे पोलीस हवालदार नंदेश म्हामुणकर, रामधन पठे, सचिन भगत, राजेंद्र खोतकर तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हयातील अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी येथील राहणारा तरुण मल्लिनाथ श्री होद्लूरे (अर्जुन) हा गेली 15 वर्षापासून उरण शहरात लक्ष्मी फोटो स्टुडीओ चालवीत असून उरण शहरात 13 जुलैपासून सुरु झालेल्या लॉकडाऊन मधील बंदोबस्त करीत असलेल्या पोलीस बांधवांसाठी तो स्वतः घरी चहा बनवुन उरण चारफाटा व गणपती चौक येथे बंदोबस्त करणार्या पोलीस बांधवांना वाटप करीत आहे व चहाची व्यवस्था करीत आहे.
पोलीस बांधव लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे संरक्षण करीत असतात ते नागरिकांचे साव्रक्षण व्हावे त्यासाठी रात्रंदिवस पहारा करतात. गणपती, दिवाळी व इतर सणामध्ये आपण सर्व सण साजरे करीत असतो परंतु त्या वेळेस पोलीस बंधू आपला पहारा करीत असतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहुन पहारा करून आपल्या नागरिकांची नेहमीच सेवा करीत असतात, अशा पोलीस बांधवांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. मी माझे भाग्य समजतो, असे मल्लिनाथ होद्लूरे (अर्जुन) यांनी सांगितले.