Breaking News

रोहा तालुक्यात 27 नवीन रुग्ण

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यात रविवारी 27 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. तर कोरोना संसर्गमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधीतांची संख्या 337 वर पोहचली आहे. आतापर्यंत 269 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गमुळे आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोहा तालुक्यात आता 60 सक्रीय कोरोना बाधीत व्यक्ती आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार चालु आहेत.

आढळलेल्या रुग्णांत यामध्ये व्यक्तीमध्ये अष्टमी पाच, नागोठणे दोन, सेवादल आळी दोन, ब्राम्हाण आळी दोन, भातसई, वरसे, आंबेवाडी, गिता गंगोत्री, निर्माण दिप सोसायटी, एकतानगर भुवनेश्वर, विष्णुनगर धाटाव, काजुवाडी, म्हाडा कॉलनी, सुकेळी, शिवराज दर्शन बंगलेआळी, वरसे,  धावीर रोड, शांतीनगर भुवनेश्वर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

उरण तालुक्यात 18 जणांना लागण

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यात रविवारी 18 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये जासई दोन, खोपटे दोन, मोरा, लक्ष्मी अपार्टमेंट विमला तलाव, कामठा, ओम साई अपार्टमेंट, हरीपांडव पाथ, बालई, नागाव,  धाकटी जुई, दिघोडे, करळ, सावरखार, सोनारी, घारापुरी, चिरनेर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तसेच द्रोणागिरी बोकडवीरा दोन, करळ, सोनारी, चिरनेर, जांभूळपाडा जासई, म्हातवली, कोटनाका, आवरे, बोकडवीरा, नवापाडा विंधणे, करंजा रोड, जसखार येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 627 झाली आहे. त्यातील 447 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 163  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

कर्जत तालुक्यात 16 नवे पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

कर्जत तालुक्यात रविवारी 16 कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 340 वर पोहचली असून 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांत कर्जतमध्ये सात, नेरळ दोन, भालीवडी, वेणगांव, दहीवली, तिघर, हालीवली, मुद्रे, उकु्रळ येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तसेच यामध्ये पाच महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत 114 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 11 रुग्णांची नोंद

महाड : प्रतिनिधी       

महाड तालुक्यात रविवारी नव्याने 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महाड बंद शिथील करण्यात आला आहे, तर शहरात दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. आढळलेल्या रुग्णांत बिरवाडी 32 वर्षीय पुरुष, आदर्शनगर बिरवाडी 54 वर्षीय पुरुष, नडगाव तर्फे बिरवाडी 42 वर्षीय स्त्री व 16 वर्षीय पुरुष आणि एक पुरुष, दासगाव 48 वर्षीय स्त्री, फौजी आंबवडे 75 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय पुरुष, जनीपेठ महाड 56 वर्षीय पुरुष, महाड शहर दोन स्त्रीयांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण 54 रुग्ण उपचार घेत असून, 97 रुग्ण बरे झाले आहेत तर एकुण 166 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply