Breaking News

महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी -मुख्यमंत्री

कोल्हापूर : प्रतिनिधी

भाजप, शिवसेना व मित्र पक्षांची महायुती सत्तेसाठी नाही, तर विचारांची आहे असे सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व साथीदारांची महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 24) येथे केला. ते महायुतीच्या सभेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कोल्हापुरात प्रचाराचा शुभारंभ करताना शक्तिप्रदर्शन केले. याद्वारे महायुतीने पुन्हा आम्हीच सत्तेवर येणार असल्याचे दाखवून दिले.

तपोवन मैदानात झालेल्या विराट सभेस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रीय समाज पक्षाचे मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महायुतीचे मंत्री, प्रमुख पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

महाआघाडीत 56 पक्ष असल्याचे सांगितले जाते, पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. जिंकण्यासाठी 56 पक्ष नव्हे; तर 56 इंचाची छाती लागते, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांना बारामतीचा पोपट अशी उपमा देऊन नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही, तर मनात राष्ट्रवाद असावा लागतो असे सांगून काँग्रेसने फक्त सगेसोयर्‍यांची गरीबी हटविल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

विरोधकांचा टायर पंक्चर : उद्घव ठाकरे

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेताना त्यांचा टायर पंक्चर झाला असल्याचा टोला लगावला. जनतेच्या हितासाठी महायुती केली असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

– अंबाबाईचा घेतला आशीर्वाद

कोल्हापूर येथे महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेत विजयासाठी साकडे घातले. या वेळी शिवसेना-भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. महायुतीचा विजय असो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देऊन परिसर दणाणून सोडला.

– भाजप युती सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक महुत उभारले गेले. इंदू मिलची जमीन हस्तांतरित झाली. त्यामुळे बहुजन समाजाला युतीच न्याय देऊ शकते.

-रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply