Breaking News

खोपोलीच्या प्रभारी मुख्याधिकारी पहिल्याच दिवशी ’अ‍ॅक्शन’मध्ये; बेशिस्त दुकानदारांवर कारवाई

खोपोली: बातमीदार

खोपोली नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव जोरात सुरू आहे. यात मुख्याधिकारी गणेश शेट्येही सुटलेले नाहीत. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आत्ता त्यांच्या जागी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून खालापूरच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे बुधवारी खोपोलीचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी यांनी सुपूर्द केला आहे. गुरुवारी मुख्याधिकारी भणगे यांनी पहिल्याच दिवशी सकाळी खोपोली बाजारपेठ व भाजीपाला मार्केट या गर्दीच्या ठिकाणी स्वतः जाऊन पहाणी केली व बेशिस्त व बेजबाबदार व्यापारी, नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. पहिल्याच दिवशी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून व सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले आहे. कडक उपाययोजना व कोरोना संदर्भातील नियमांचे पालन शंभर टक्के झाल्याशिवाय खोपोली व परिसरातील कोरोना आटोक्यात येणार नाही हे स्पष्ट आहे .त्यासाठी नगरपालिका प्रशासन कडून प्रभावी कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने  मुख्याधिकारी भणगे या स्वतः या  अ‍ॅक्शन मोडमध्ये असल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply