माणगाव : प्रतिनिधी
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाची कोविड चाचणी करून घेणे आवश्यक असल्याची मागणी माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे.संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, जनतेचा संपर्क हा व्यापारी वर्गाशी अधिक प्रमाणात येत असतो. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असून त्याचा फैलाव गर्दीतून लवकर होत आहे. किराणा दुकानदार, हॉटेलवाले, वडापाव टपरीवाले, भाजी व फळ विक्रेते, हातगाडीवर विक्री करणारे भाजी व फळवाले, अत्यावश्यक सेवांची दुकाने तसेच खाजगी दवाखान्यातील डॉक्टर्स या सर्वांचीच कोविड चाचणी होणे आवश्यक आहे. या सर्व व्यापार्यांनी स्वतःहून आपली चाचणी चाचणी करून घेणे, जे व्यापारी कोविड चाचणी करून घेणार नाहीत, अशा व्यापार्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांने पुढाकार घेऊन त्यांना दुकाने उघडून देऊ नये, अशी मागणी संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper