Breaking News

रायगड जिल्ह्यात 372 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाच्या 372 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 152, ग्रामीण 46) 198, अलिबाग 48, पेण 36, उरण 18, खालापूर 16, कर्जत 13, महाड 11, रोहा व म्हसळा प्रत्येकी नऊ, मुरूड सहा, श्रीवर्धन पाच, माणगाव दोन आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तर मृत रुग्ण उरण, अलिबाग व पेण प्रत्येकी दोन आणि पनवेल, खालापूर व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 331 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 14,206 वर गेला असून, मृतांची संख्या 368 झाली आहे. जिल्ह्यात 9853 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने 3521 रुग्ण सक्रिय आहेत. 

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply